डोंबिवलीतील बेकायदेशीर देशी-विदेशी दारूचा साठा जप्त! एका महिला आरोपीचाही समावेश

डोंबिवली पूर्वेकडील निळजे येथे सापळा रचत बेकायदेशीररित्या विनापरवाना असलेल्या विदेशी दारूच्या बाटल्यानी भरलेला एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

    डोंबिवली : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील आठवड्याभरात डोंबिवलीत धडक कारवाई करत बेकायदेशीर रित्या विनापरवाना देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने डोंबिवली पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात एक मे ड्राय डे च्या दिवशी देशी-विदेशी मद्य विक्री करत असलेल्या एका महिलेला अटक केली आहे. मैनाबाई भोईर असे या आरोपी महिलेचे नाव आहे. त्यापाठोपाठ डोंबिवली पूर्वेकडील निळजे येथे सापळा रचत बेकायदेशीररित्या विनापरवाना असलेल्या विदेशी दारूच्या बाटल्यानी भरलेला एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

    डोंबिवली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, या प्रकरणात 188 बल्क लिटर विदेशी दारू आणि बियर असा एकूण चार लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करत अमित यादव या टेम्पो चालकाला अटक केली आहे. या दोघांनी हे विदेशी देशी मद्य कुठून आणले याचा शोध सुरू आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात १ मे ड्राय डेच्या दिवशी एक महिला देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती डोंबिवलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे मच्छी मार्केट परिसरात सापळा रचत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या मैनाबाई भोईर या महिलेला अटक केली. त्याच्याकडून देशी विदेशी दारू असा एकूण एक लाख 31 हजाराचा मुद्दामल जप्त केला आहे.

    डोंबिवलीमध्ये बेकायदेशीर विनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती डोंबिवलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डोंबिवली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने डोंबिवली पूर्वेकडील निळजे परिसरात सापळा रचला. एक टेम्पो संशयास्पद रित्या आढळून आल्याने या पथकाने टेम्पो थांबवून टेम्पोची झडती घेतली असता या टेम्पोमध्ये 188 बल्क लिटर विदेशी दारू आणि बियर असा एकूण चार लाख 13 हजारांचा मुद्देमाल आढळून आला याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंद करत टेम्पो आणि दारू जप्त केले आहेत. या प्रकरणी अमित यादव या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. त्यानेही दारू कुठून आणली याचा शोध आता एक्साईज विभाग करत आहे.