शहरात नियमबाह्य होर्डिंग ; तब्बल  ३५७ जणांना नोटीसा

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची

    पिंपरी : महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाला शहरातील नियमबाह्य होर्डिंग दिसले आहेत. पालिकेच्या वतीनेशहरातील ३५७ होर्डिंगचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास ते होर्डिंग तोडूनजप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

    परवानगीपेक्षा अधिक आकाराचे होर्डिंग असणे, एका बाजूची परवानगी घेऊन दोन्ही बाजूने होर्डिंग लावणे, होर्डिंगवर आकाशचिन्ह वपरवाना विभागाने दिलेला परवाना क्रमांकाचा छोटा फलक न लावणे या कारणांसाठी या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या अनधिकृतहोर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.

    शहरात २० एप्रिल ते आतापर्यंत तब्बल १६८ अनधिकृत होर्डिंग तोडण्यात आले आहेत. त्यातील ९५ होर्डिंग मालक व चालकांनी काढूनघेतले आहेत. तर, एकूण ७३ होर्डिंग महापालिकेने तोडून जप्त केले आहे. त्यातून मिळालेल्या भंगारातून पालिकेस २ कोटी ३० लाखांचेउत्पन्न मिळाले आहे.

    न्यायालयात गेलेल्या अनधिकृत २८१ होर्डिंपैकी २६३ होर्डिंगचे एकूण ४ कोटी १९ लाख ५० हजार ८१६ रुपये परवाना शुल्कमहापालिकेकडे जमा करण्यात आले आहेत. न्यायालयात गेलेल्या होर्डिंगचालकांकडून पाचपट शुल्क घेऊन त्याच्या होर्डिंगला रितसरपरवाना दिला जाणार आहे. पाचपट शुल्क न भरणारे होर्डिंग तोडून जप्त करण्यात येणार आहेत, असे आकाशचिन्ह व परवानाविभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.