पुण्यातील बड्या हॉटेल्स व पबमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर..!

मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना देखील या आदेशाला गुंडाळत शहरातील बड्या हॉटेल्स व पबमध्ये सरास अमली पदार्थ तसेच हुक्काचे पॉट प्रत्येक टेबलावर ठेवून धुरकांड्या सोडत आहेत.

  पुणे, शहरात अमली पदार्थांच्या तस्करीसोबतच बड्या हॉटेलांमध्ये व पबमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर देखील जोरात सुरू असल्याचे वास्तव पाहिला मिळत आहे. शहरातील बहुचर्चित राजा बहाद्दुर मिलमधील हॉटेल ड्रामा ९, कोरेगांव पार्क येथील रॉक वॉटर आणि मोका हॉटेल्सवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी केली. याठिकाणी अवैधरित्या हुक्का पुरविला जात असल्याचे समोर आले आहे. तर, हुक्का पिणाऱ्यांवर देखील कारवाईकरून खटले दाखल केले आहेत. संबंधित हॉटेल मॅनेजर व वेटरवर गुन्हे दाखल केले आहेत.

  – रॉक वॉटर, मोका तसेच राजा बहाद्दुरमील येथील हॉटेल ड्रामावर छापे
  याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात हॉटेल ड्रामा ९, तसेच कोरेगांव पार्कमधील रॉक वॉटर व मोका या हॉटेलच्या मॅनेजर व वेटर यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ, २१ अ नुसार गुन्हा दाखल केले आहे. तर, येथे हुक्का पिणाऱ्या शेकडो जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

  – हुक्का पिणाऱ्यांवरही पोलिसांनी खटले दाखल केले; गुन्हे शाखेची कारवाई
  ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे, तसेच एनडीपीएस विभागाचे सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार आण्णा माने, प्रमोद मोहिते यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
  – पुणे पोलिसांची शहरातील तीन हॉटेलवर छापेमारी; गुन्हे दाखल
  मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना देखील या आदेशाला गुंडाळत शहरातील बड्या हॉटेल्स व पबमध्ये सरास अमली पदार्थ तसेच हुक्काचे पॉट प्रत्येक टेबलावर ठेवून धुरकांड्या सोडत आहेत. तरुणाई या हॉटेल्समध्ये तुंडूब गर्दी करत त्याची चव घेत आहेत. पण, त्यावर मेहरबान असणाऱ्या पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.

  शहरातील अवैध धंद्यांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर लागलीच गुन्हे शाखेच्या पथकांनी अशा हॉटेल्सची माहिती काढून त्यावर कारवाई केली. कोरेगाव पार्क येथे गेरा लिजंट या इमारतीतील रूफ टॉप हॉटेल रॉक वॉटरवर छापा मारला. त्याठिकाणी अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याचे समोर आले. तर, राजा बहाद्दुर मिलच्या आवारातील हॉटेल ‘ड्रामा ९’ तसेच कोरेगांव पार्क येथील लेन नंबर ७ येथील हॉटेल मोका येथीही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  नवे अधिकारी लगेच कारवाई…
  शहरात नवे अधिकारी आल्यानंतर महिने दोन महिने अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका सुरू होते. मग, हे अधिकारी त्या-त्या पोलीस ठाण्यांचे प्रमुख असो वा परिमंडळाचे किंवा थेट पोलीस आयुक्त. त्यातही आयुक्त नवे आले की गुन्हे शाखेला जाग येते अन् जोमाने कारवाईला सुरूवात होते. पण, त्यानंतर या धडक कारवाईला हळुहळु विराम मिळायला लागतो. पण, या कारवाईत सातत्य असणे गरजेचे आहे. स्थानिक पोलिसांच्याच आर्शिवादाने हुक्का पार्लर, पहाटेपर्यंत हॉटेल्सवर दणक्यात नाचगाणे सुरू असते. मद्याचे पाट या हॉटेल्समध्ये वाहू लागतात. तर, अवैध धंदे देखील तेजीत सुरू असतात. ते पुन्हा नवे अधिकारी येऊपर्यंत नित्यनियमाने सुरू राहतात.