
लोणंद : फलटण तालुक्यातील आरडगांव येथे गेल्या अनेक महीन्यापासून अवैध दारु विक्री जोमात चालली असून त्यामुळे यूवा मुले व्यसनाच्या विळख्यात अडकली जात आहेत.
लोणंदवरुन वाईन शॉपमधून ही दारु खरेदी केली जात असून ती चढया दराने गावामध्ये विकली जात आहे. याचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात गावाला सोसावा लागत आहे. गावात दारू आणून विकत असलेने आठवडयातून एकदा पिणारे बहाददरही दररोज याचे सेवन करुन घरात भयंकर महीलांना त्रास देत आहेत. महिलाही यामुळे भयंकर चिडलेल्या असून जर पोलीस प्रशासनाने याची योग्य दखल घेतली नाही तरं आम्हा सर्व महिलांना प्रसंगी रस्त्यावर ऊतरावे लागेल असा सज्जड इशाराच त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
लोणंद सपोनि विशाल वायकरसाहेब यांनी याकडे गांर्भीयाने लक्ष देऊन गावात सुरू असलेली अवैद्य दारु विक्री त्वरीत बंद करून आम्हा महिलांना न्याय मिळवून द्यावा
-त्रस्त महीला, आरडगांव
गेली अनेक वेळा याबत लोणंद प्रशासनाला याबाबतची माहीती दिली गेली आहे मात्र अवेध दारु विक्री करणारया लोकांच्या डोक्यावर गावातील बडया धेंडेचे हात असलेने पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसलेने गावात दारु विक्री जोमात सुरू आहे. जर हे थांबले नाही तर प्रसंगी आम्हाला सातारा एस पी ऑफीसला कळवावे लागेल
- सामाजिक कार्यकर्ते अजित भोईटे आरडगांव
तरी तत्पर याची दखल लोणंद प्रशासनाने घेऊन गावामध्ये बेधडक चालू असलेली अवेध दारु विक्री बंद करावी अशे आवाहन आरडगांव ग्रामस्थांतर्फे पोलिस प्रशासनाला करणेत येत आहे.