Solapur ZP
Solapur ZP

राज्याच्या शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या व्यस्तापणामुळे : शिक्षणविभागाला अधिकारी मिळत नसल्याची चर्चा जोर धरत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदली प्रस्तांवावर सह्या झाल्या नसल्यामुळे बदली प्रक्रीया लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    सोलापूर : राज्याच्या शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या व्यस्तापणामुळे : शिक्षणविभागाला अधिकारी मिळत नसल्याची चर्चा जोर धरत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदली प्रस्तांवावर सह्या झाल्या नसल्यामुळे बदली प्रक्रीया लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.शिक्षणमंत्र्याची वाट पाहत आहे “सही ” आशी हक्क देण्यात येत आहे.

    माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांची खुर्ची अद्यापही रिकामीच असून याठिकाणी अद्याप ही नवीन अधिकारी आलेला नाही किंवा येथील पदभारही कोणाला दिलेला नाही. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नवीन अधिकारी येणार की इतर अधिकाऱ्यांकडे पदभार दिला जाईल याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. सुलभा वटारे शिक्षणाधिकारी (योजना ) उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे , आणि नाळे यांच्या नावांची प्रभारी पद देण्यासाठी चर्चा होत आहे. सामान्य प्रशासनाने या तिघांपैकी कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब केला आहे आद्यप गुलदस्तात्यात आहे. भास्करराव बाबर यांच्या बदली नंतर माध्यमिक शिक्षणधिकारी पद शासनाकडून भरण्यात आले नाही.
    प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार हा प्रभारीवरच सुरू आहे. तेव्हा या दोन्ही विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून महिला व बालकल्याणचे तत्कालीन कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्याकडे पदभार देण्यात आला होता.

    तत्कालीन प्राथमिक किरण लोहार यांच्यावर एसीबीची कारवाई झाल्यानंतर या जागी उपशिक्षणाधिकारी संजय ज यांच्याकडे प्रभारी शिक्षणाधिक पदाचा पदभार देण्यात आला आहे. गेल्या नऊ महिन्यापासून याठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांची जागा रिक्तच आहे. त्यामुळे महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या दोन्ही जागेवर पूर्णवळ अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या जिल्हा परिषद मुख्यालयातील दोन्ही शिक्षण विभागासह सामान्य प्रशासन, जिल्हा जलसंधारण, ग्रामीण पाणी पुरवठा मुख्य लेखा व वित्त अधिकारी या विभागांचा कारभार प्रभारीवरच सुरू आहे.