The heat of summer will increase in the state; An incoming heat wave; Alert issued by IMD for citizens of Mumbai, Thane and Raigad

मुंबई : महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विशेषत: मुंबई, ठाणे आणि रायगडच्या नागरिकांसाठी आएएमडीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळे आयएमडीने नागरिकांना सतर्क केले आहे.

    मुंबई : राज्यात उन्हाचा कडाका वाढणार आहे. मुंबई, ठाण्याच्या नागरिकांना प्रचंड ऊन जाणवत आहे. आएएमडीने त्यावर शिक्कामोर्तबच केले आहे. आयएमडीने याबाबत अलर्ट जारी केलाय. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. आज आणि उद्या ३६ ते ३८ डिग्री सेल्सियस तापमान राहणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे.

    राज्यात तापमान वाढलं आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये देखील तापमानाने कहर केला आहे. डोकं आणि तोंड झाकून घेतल्याशिवाय नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झालं आहे. उष्ण झळा लागत आहेत. उष्माघाताचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने याच संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडकरांसाठी दोन दिवस धोक्याचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.