घाटी रुग्णालय परिसरात कर्मचारी संघटनेचं अमरण उपोषण

ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या जागेवर ती त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

    औरंगाबाद : कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांसाठी घाटी रुग्णालय परिसरात अमरण उपोषण सुरू आले आहे.  आज उपोषणाचा दुसरा दिवस असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

    काही दिवसांपूर्वी अर्चना निलेश बनसोडे यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले होते. ते घाटी रुग्णालयात शासकीय कर्मचारी असताना वारसा हक्क प्रमाणे त्यांच्या पत्नीला नोकरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र अर्चना यांच्या सासूला नोकरी देण्यात आली होती. यासाठी संघटनेच्या वतीने तक्रार देण्यात आली होती. या संदर्भात एक चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या चौकशीमध्ये तीन अधिकारी दोषी आढळून आले असून अर्चना यांच्या सासूला कामावरून कमी करून अर्चना यांना नोकरी देण्यात यावी असा आदेश सदर समितीने दिला होता.

    मात्र अजून सुद्धा अर्चना निलेश बनसोडे यांना नोकरी देण्यात आली नाही. तसेच ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या जागेवर ती त्यांच्या कुटुंबाला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.