रावसाहेब दानवे अन् भागवत कराड यांची महत्त्वपूर्ण बैठक; उमेदवारी संदर्भात निर्णय होणार?

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचे अधिकारी आणि प्रशासनासोबत आढावा बैठकिला सुरूवात झाली आहे.

    बीड : बीड जिल्ह्याच्या अस्मितेचा अहमदनगर बीड परळी रेल्वे महामार्गाच्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचे अधिकारी आणि प्रशासनासोबत आढावा बैठकिला सुरूवात झाली आहे. अनेक वर्षापासून रखडलेल्या रेल्वे महामार्गाच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
    लोकसभा निवडणुकीतील उमेदवार या संदर्भात देखील दोन्ही केंद्रीय मंत्री पक्षश्रेष्ठीकडे महत्त्वाच्या शिफारशी करण्याची शक्यता देखील व्यक्त केले जात आहे.