आज कोरोनाबाबत राज्य सरकारची महत्त्वाची बैठक, पुन्हा मास्क बंधनकारक होणार? लॉकडाऊन लागला तर…जाणून घ्या काय आहे परिस्थिती?

वाढत्या कोरोना रुग्णामुळं केंद्राने पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यांना काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या धरतीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

    मुंबई – मागील दोन तीन वर्षात कोरोनाच्या संकटामुळं अख्यं जग हादरलं आहे. कोरोनाच्या महामारीमुळं आता कुठं जग सावरत असताना, आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. तसेच देशात देखील कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. या धरतीवर कोविडचा पहिला, दुसरा डोस, साठ वर्षांवरील बुस्टर डोस लोकांना देण्यात आला आहे. परंतु आता नवीन कोरोनाचा नवीन व्हेरियंट आल्यामुळं केंद्राने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढण्यास कारणीभूत ठरलेला नवा कोरोना व्हेरियंट BF.7 चा भारतात शिरकाव झाला आहे. देशात या व्हेरियंटचे विविध राज्यांमध्ये चार रुग्ण आढळून आले आहेत, पण महाराष्ट्रात एकही रूग्णाचा समावेश नाही.

    दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णामुळं केंद्राने पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यांना काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या धरतीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर आम्हाला अंतिम निर्णय दिले जातील, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आजच्या बैठकीतून महत्त्वाच्या सूचना तसेच काही निर्बंध यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

    पुन्हा मास्क बंधनकारक होणार?

    मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तसेच कोरोना व्हेरियंट BF.7 चा भारतात शिरकाव झाला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये चार रुग्ण आढळून आलेत, पण महाराष्ट्रात एकही रूग्णाचा समावेश नाही. तरी देखील काळजी घेण्यासाठी काही निर्बंध, नियमावली जारी करण्यात येऊ शकते. गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक होण्याची शक्यता आहे. तर कोरोनाचे रुग्ण वाढत गेल्यास टाळेबंदी सुद्धा होऊ शकते, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    वर्क फ्रॉम होमचा आग्रह धरला जाणार का?

    दरम्यान, काल केंद्राने बैठक पार पडली असता, विदेशातून आल्यास रँडम सँपलिंग, राज्यांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती लागू करण्याचा विचार, ज्या भागांत नवे रुग्ण अधिक असतील, ते क्लस्टर बनतील, आयसोलेशन वाढणार तसेच विदेशातून येणाऱ्या लोकांसाठी काय प्रोटोकॉल आदीवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळं जर कोरोनाचे असेच रुग्ण वाढत गेले तर वर्क फ्रॉर्म होमच आग्रह बैठकीत धरला जाणार का? किंवा याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

    …तर लॉकडाऊन अटळ

    कोरोनाचे नवीन व्हेरियंट आढळल्यामुळं सर्वंजण चिंतेत आहेत. यामुळं पुन्हा मास्क, कोरोनाची नियमावील, निर्बंध त्याचबरोबर पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनला सामोरी जावे लागू शकते. रुग्ण वाढत गेल्यास टाळेबंदी सुद्धा होऊ शकते, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    महाराष्ट्रात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत 30  टक्क्यांची घट

    महाराष्ट्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०% घटली आहे. नगर, जळगाव, अकोला व पुण्यात पॉझिटिव्हिटी दर एक टक्का आहे. सध्या राज्यात कोरोनाचे १३५ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी राज्यात ३० नवे रुग्ण आढळले, मात्र एकही मृत्यू झालेला नाही.