महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नचा तिढा! आता सांगलीतील जत तालुका कर्नाटकात जाणार?

सांगलीतील जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी एकमताने कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटकचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकार विचार करत असल्याची माहिती आहे.

    महाराष्ट्र () आणि कर्नाटक () सीमेचा प्रश्न अद्याप सुटला नाही आहे. आता याबाबत पुन्हा एक मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटक सरकार सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यावर दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितलं.

    सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथल्या नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा एकमताने ठराव केला आहे. हा ठराव त्यांनी कर्नाटक सरकारकडे सादर केला असून याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

    जत तालुक्याला देणार पाणी

    सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर तालुक्यात होणारी पाण्याची टंचाई पाहता कर्नाटक पाणी देणार असल्याच सांगण्यात येत आहे. याकरिता जत तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा आम्ही तयार करणयात आल्याची माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली.तसेच महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देण्याचा तसेच शेजारील राज्यातील कन्नड स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शनही देण्यात देण्याचा विचार सुरू असल्याचंही,  बोम्मई यांनी सांगितले आहे.