मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यास कारावास; वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

सहा वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धा आर. व्ही. आदोने यांनी दिला.

    वर्धा : सहा वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धा आर. व्ही. आदोने यांनी दिला. रोशन बेनीराम पाचे रा. वर्धा असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
    रोशन पाचे याला तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांचा कारावास, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 (ii) व 12 अन्वये तीन वर्षाचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. शिवाय कलम 257 नुसार पीडितेस नुकसानभरपाई म्हणून दंडाच्या रक्कमेतून तीन हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे.
    रामनगर पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुरज तेलगोटे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. शासकीय बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता गिरीष व्ही. तकवाले यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून शंकर कापसे, नरेंद्र धोंगडे यांनी काम पाहिले. एकूण सात साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेता न्यायाधीशांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.