चार बालकांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी निलंबित, नगरविकासमंत्र्याची माहिती

चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित (Medical Officer Suspension) करण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.

    मुंबई : भांडुपच्या (Bhandup) सावित्रीबाई फुले रुग्णालयात (Savitribai Phule Hospital) चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित (Medical Officer Suspension) करण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सभागृहात हा विषय उपस्थित केला होता.

    फडणवीस यांची आग्रही मागणी
    पालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी असून रुग्णालयात गैरसोयी आहेत, बालकांच्या मृत्यूप्रकरणी दुर्लक्ष का झाले, कोण जबाबदार आहे, का कारवाई होत नाही, या विषयी सभागृहात तातडीने चर्चा करा, संबंधित अधिकारयांवर तातडीने निलंबित करा अशी फडणवीस यांची आग्रही मागणी होती. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रस्ताव नाकारून सरकारला निवेदन करण्याचे आदेश दिले  होते,  मात्र यावर विरोधक संतप्त झाले, ते जागा सोडून पुढे आले, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

    आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करण्याची घोषणा
    यातच आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबद्दल काढलेल्या उद्गाराबद्दलची लक्षवेधी चर्चेला आली, त्यावर शिवसेना सदस्य आक्रमक झाले, ते जागा सोडून पुढे आले, यात गदारोळ झाल्यामुळे कामकाज १० मिनिटे स्थगित झाले. पुन्हा कामकाज सुरू होताच रुग्णालयाच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली आणि गदारोळ शांत झाला.