In a fight between two leopards, an injured leopard took the support of a chucky cement pipe to save his life

बिबट्याला पकडण्यासाठी गोंदियाचे सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक ) राऊत आपली रेशक्यू टीम घेऊन पोहचले. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. गर्दीमुळे रेस्को करण्यात अडचण निर्माण होत होती. वनविभाग आणि पोलिसांनी गर्दीला दूर केल्यानंतर काही वेळाने त्या बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यात रेशक्यू टीमला यश आले.

    साकोली : आज पहाटेच्या दरम्यान दोन बिबट्याच्या झालेल्या झुंजीत एक बिबटया गंभीर जखमी झाल्याची घटना सानगडी सहवन क्षेत्रातील सिरेगाव बीटात घडली आहे. जखमी बिबट्याने सुरक्षेसाठी सिमेंटच्या पाईपचा आधार घेतला. वनविभागाने जखमी बिबट्याचे रेशक्यू करून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविले आहे.

    साकोली वन परीक्षेत्राच्या सानगडी सहवन क्षेत्रातील सिरेगावबांध जलाशय जवळील नवेगावबांधकडे जाणाऱ्या राज्य मार्गाच्या पाईपमध्ये एक जखमी बिबटया असल्याचे माहिती सकाळी मोहफुल वेचण्याकरिता गेलेल्या लोकांनी दिली. त्यांनी सकाळी ६ वाजताचे दरम्यान सानगडी येथील वनरक्षक बालाजी कदम यांना माहिती दिली. वनरक्षक कदम यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी घटनेची शहानिशा करून आपल्या वरिष्ठाना याची माहिती कळविली.

    यावेळी साकोलीचे सहायक वनसरक्षक राठोड, वन परिक्षेत्रातील अधिकारी मनीषा चव्हाण या आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाल्या. बिबट्याला पकडण्यासाठी गोंदियाचे सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक ) राऊत आपली रेशक्यू टीम घेऊन पोहचले. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. गर्दीमुळे रेस्को करण्यात अडचण निर्माण होत होती. त्यांना पांगविण्यासाठी सानगडी पोलिसांना पाचरण करण्यात आले. वनविभाग आणि पोलिसांनी गर्दीला दूर केल्यानंतर काही वेळाने त्या बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यात रेशक्यू टीमला यश आले.

    हा बिबटया जखमी असल्याने वनविभागाने त्याचेवर शासकीय रोपवाटिका शिवनीबांध येथे पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे प्राथमिक उपचार केले. परंतु, पुढील उपचार बिबट्यावर येथे करण्याची व्यवस्था नसल्याने, त्याला नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रालयात पाठविण्यात आले. बिबट हा नर जातीचा असून त्याचे अंदाजे वय १० ते ११ वर्ष आहे. यावेळी सानगडीचे क्षेत्र सहायक सुनील वैद्य, उके, साकोलीचे क्षेत्र सहाय्यक साखरे, खांडेकर, वनरक्षक भुजाडे, नंदेशवर व इतर वन कर्मचारी व वन मजूर होते.