अंबरनाथ-बदलापूरमध्ये सकाळीच राखेचे साम्राज्य; कंपनीतील आगीचे कारण…

अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील पद्मावती पेपर कंपनीच्या गोदामाला ही आग रात्री एकच्या सुमारास लागली होती. या आगीची माहिती मिळताच औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवले.

    ठाणे : बदलापूर (Badlapur)आणि अंबरनाथ शहराच्या बहुतांश भागात सकाळीच पसरलेल्या राखेमुळे (Ash) खळबळ उडाली आहे. घराबाहेरील जागेत, रस्त्यांवर, पार्कींगमध्ये, झाडांवर सगळीकडे राखच राख दिसत असून त्यामुळे चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, मध्यरात्री अंबरनाथच्या एका कागद पुनर्प्रक्रिया (Paper Recycling) करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग (Warehouse Fire) लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राख पसरल्याची शक्यता आहे.

    अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील (Ambernath MIDC) पद्मावती पेपर कंपनीच्या (Padmavati Paper Company) गोदामाला ही आग रात्री एकच्या सुमारास लागली होती. या आगीची माहिती मिळताच औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवले.

    पद्मावती पेपर कंपनीच्या मागच्या बाजूस असलेल्या साठा करून ठेवलेल्या कागद, पुठ्ठ्यांच्या गोदामाला ही आग लागली होती. रात्री एकच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे. कंपनीच्या इतर भागात सुदैवाने ही आग पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.