आनंद हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना डॉक्टरांकडून मदतीचा हात

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील आनंद हॉस्पिटल हे गोरगरीब जनतेसाठी नेहमीच पुढे सरसावत आहे. गेल्या दोन वर्षाखाली कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीब जनतेस मोफत उपचार करून आपल्या हॉस्पिटलचे नाव डॉक्टर आनंद गवळी यांनी नावावर रूपास आणले आहे.

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील आनंद हॉस्पिटल हे गोरगरीब जनतेसाठी नेहमीच पुढे सरसावत आहे. गेल्या दोन वर्षाखाली कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीब जनतेस मोफत उपचार करून आपल्या हॉस्पिटलचे नाव डॉक्टर आनंद गवळी यांनी नावावर रूपास आणले आहे. तसेच गोरगरिबांना आर्थिक मदत आणि मोफत उपचार देऊन डॉक्टर आनंद गवळी हे सेवा करत आहेत.

    अडचणीच्या काळात आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब नागरिकांना मोफत डोळ्याचे शिबिर ठेवून त्यांचे ऑपरेशन तसेच चष्मा हे सर्व साहित्य डॉक्टर स्वखर्चातून देतात. अनेक आजारावरील शिबिरे भरून डॉक्टर आनंद गवळी व त्यांच्या पत्नी ज्योती गवळी यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपल्या हॉस्पिटलचे नाव आणि स्वतःचे नाव गोरगरीब यांच्या पर्यंत पोहोचवले आहे.

    पंढरपूर तालुका तसेच आसपासच्या खेड्यातील नागरिक आनंद हॉस्पिटल ला भेट देण्यासाठी येतात. त्यावेळी डॉक्टर आनंद गवळी व डॉक्टर ज्योती गवळी यांच्याकडून पहिले त्या रुग्णांना मानसिक समाधान देऊन आधार देण्याचे काम करतात. यावेळी 90 टक्के रुग्ण हा त्यांच्या सल्ल्याने बरा होतो त्यानंतर त्यांना जर गरज भासल्यास उपचार केले जातात नसेल तर त्यांना समजावून सांगून थोडक्यात उपचार करून त्यांना मानसिक समाधान मिळवून देतात. तसेच तो रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या घरातील नातेवाईकांसह डॉक्टर साहेबांना भेटण्यासाठी येतात एखाद्या वेळेस जर एखाद्या रुग्णांजवळ पैसे नसले तरीसुद्धा डॉक्टर स्वखर्चाने त्यांना उपचार करून मेडिकलमधील मेडिसिन सुद्धा घेऊन देतात.

    तसेच वर्षातून वेगवेगळ्या आजाराचे शिबिरे भरून लहान मुलापासून ते वयोवृद्ध नागरिकांना सुद्धा महत्त्वाचे सल्ले आणि त्यांच्यावर उपचार केले जातात असे हे कासेगाव मधील आनंद हॉस्पिटल.