आटपाडीमध्ये रूग्णावर मंत्रतंत्र करून धर्मांतराचा प्रयत्न, शयित ख्रिस्ती धर्म प्रसारकास अटक

संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्‍विनीसह रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जाऊन रूग्ण तरूणीच्या कपाळावर हात ठेवून मंत्राद्बारे उपचार करण्याची ध्वनीचित्रफित समोर आली होती. हा प्रकार धर्मांतराचा असल्याचा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला होता.

    सांगली : आटपाडीमध्ये रूग्णावर मंत्रतंत्र करून धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळेला आटपाडी पोलिसांनी सांगलीतून अटक केली. न्यायालयाने गेळेला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरूवारी पोलिसांना दिले.

    संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्‍विनीसह रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जाऊन रूग्ण तरूणीच्या कपाळावर हात ठेवून मंत्राद्बारे उपचार करण्याची ध्वनीचित्रफित समोर आली होती. हा प्रकार धर्मांतराचा असल्याचा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला होता. या प्रकरणी गेळे दांम्पत्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. गेळे दांम्पत्याला अटक करून कठोर कारवाई व्हावी यासाठी आटपाडीत रविवारी बंद पाळण्यात आला होता.

    या घटनेनंतर बुधवारी रात्री पोलिसांनी सापळा रचून सांगलीत संजय गेळेला अटक केली. त्याची पत्नी अश्विनी अद्याप फरार आहे. संशयित आरोपी गेळे याला आटपाडीतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यासमोर हजर केले असता नायालयाने दि. ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.