औरंगाबादमध्ये जे.पी. नड्डा यांच्या सभेचे होर्डिंग फाडले, सभेआधीच राजकीय वातावरण तापले

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. तर संध्याकाळी त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच सभास्थळी आणि शहरातील चौकाचौकात यासाठी होर्डिंग लावण्यात आले आहेत.

    औरंगाबाद – औरंगाबादमध्ये आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) यांची जाहीर सभा होणार आहे. तर या सभेसाठी भाजपकडून शहरातील चौकाचौकात होर्डिंग लावण्यात आले आहे. मात्र हायकोर्टासमोरील चौकात लावलेले होर्डिंग बंजारा ब्रिगेडकडून फाडण्यात आले आहेत. संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर होर्डिंग लावण्यात आल्याने ते फाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावरून सभेआधीच राजकीय वातावरण तापले आहे.

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. तर संध्याकाळी त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच सभास्थळी आणि शहरातील चौकाचौकात यासाठी होर्डिंग लावण्यात आले आहेत. दरम्यान याचवेळी हायकोर्टासमोरील संत सेवालाल महाराज चौकात देखील होर्डिंग लावण्यात आले होते. ज्यात काही होर्डिंग संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर लावण्यात आले होते. त्यामुळे बंजारा ब्रिगेडच्या वतीने हे होर्डिंग फाडण्यात आले आहे. तर संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर हे होर्डिंग लावल्यानेच फाडण्यात आल्याचा दावा बंजारा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.