बाणेरमध्ये चेंबरची अवस्था दयनिय; महापालिकेचे दुर्लक्ष

बाणेर, बालेवाडी, बाणेर -शिवाजीनगर दोन्ही बाजूने पडलेले खड्डे या बाबत नवराष्ट्रने याबाबत अनेक वेळा बातमी दिली. याचा परिणाम म्हणून जागो जागी पडलेले खड्डे आणि रस्त्यांची झालेली चाळण याची डांबरी करणाने डागडूगी करून बूजविण्यात आले, पण चेंबरची अवस्था फार दयनिय आहे. यावर तोडगा निघणे गरजेचे आहे.

    पुणे : बाणेर, बालेवाडी, बाणेर -शिवाजीनगर दोन्ही बाजूने पडलेले खड्डे या बाबत नवराष्ट्रने याबाबत अनेक वेळा बातमी दिली. याचा परिणाम म्हणून जागो जागी पडलेले खड्डे आणि रस्त्यांची झालेली चाळण याची डांबरी करणाने डागडूगी करून बूजविण्यात आले, पण चेंबरची अवस्था फार दयनिय आहे. यावर तोडगा निघणे गरजेचे आहे.

    बाणेर ते शिवाजीनगर या दोन्ही बाजूला रोडवर खड्डे पडून भयावह परिस्थिती झाली होती, हे खड्डे बूजविण्यासाठी डांबरी करणाची डागडूगी करण्यात आली. खड्डे बुजविण्याची प्रक्रिया फार उशीरा करण्यात आली असली तरी या रस्त्याची समस्या अजूनही मिटली नाही. या रोडवर रस्त्याच्या मध्यभागी किंवा कडेला चेंबर आहेत. अनेक ठिकाणी चेंबर हे रस्त्याच्या वर आहे, तर काही खचले आहेत. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहेत.

    रस्त्यांवरील चेंबर सातत्याने दुरूस्ती करण्यात येत नाही, याचा त्रास सर्व सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. खड्डे बुजवितांना नावापूरती डागडूगी करण्यात आली. या डांबरीकरणाच्या डागडूगीने रस्ता खालीवर झालेला आहे. या दोन्ही बाजूला ३०० ते ४०० चेंबर आहेत, यांची फार दुरवस्था आहे. अनेक चेंबर धोकादायक ठरत आहेत, याची तातडीने दुरूस्ती करणे गरजेचे आहे. नाही तर एखाद्या वेळेस फार मोठी घटना घडू शकते.

    १२ मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यावरील चेंबरची दुरूस्ती क्षेत्रीय कार्यालयस्तरावर केली जाते. लोखंडी जाळीच्या एका चेंबरची किंमत दोन हजार पाचशे ते तीन हजार आहे. तर सिमेंटच्या एका चेंबरची किंमत एक हजार पाचशे आहे. एक चेंबर दुरूस्तीचा खर्च तीन ते चार हजार रूपये येतो क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत पथ विभाग सतत चेंबर दुरूस्ती करतात.

    - साहेबराव दांडगे, अभियंता