भिवंडीमध्ये इमारतीत बांधकामाची लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

मित्तलनगर येथे एका १४ मजली इमारतीच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी कामगार हे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या उद्वाहकातून वरच्या मजल्यांवर जात होते. उद्वाहक सातव्या मजल्यावर आले असता अचानक उद्वाहक खाली कोसळले. यात दोन कामगारांचा मृत्यू झाला.

    ठाणे- भिवंडी (Bhiwandi) येथील मित्तलनगर (MittalNagar) भागात बांधकामासाठी वापरण्यात येणारे उद्वाहक कोसळून (Lift Collapse) दोन कामगारांचा मृत्यू (Workers Death) झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला आहे. याप्रकरणीची नोंद निजामपूरा पोलीस (Nizampura Police Station) ठाण्यात करण्यात आली आहे.

    मित्तलनगर येथे एका १४ मजली इमारतीच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी कामगार हे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या उद्वाहकातून वरच्या मजल्यांवर जात होते. उद्वाहक सातव्या मजल्यावर आले असता अचानक उद्वाहक खाली कोसळले. यात दोन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.