n head-on collisions of two-wheelers
n head-on collisions of two-wheelers

    यवत/पुणे : बोरीऐंदी गावच्या हद्दीत सकाळी सहाच्या दरम्यान दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार, तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रेय रामदास भोसेकर (वय ५२, रा, ताम्हणवाडी) हे जागीच ठार झाले असून, दीपक बाळासाहेब ताम्हाणे( वय २८) हा जखमी झाला असून, त्यास उरुळी कांचन येथे उपचारासाठी ॲडमिट केले आहे.

    अपघाताने ताम्हणवाडी आणि बोरीऐंदी परिसरा‍‍‍वर शोककळा

    दत्तात्रेय भोसेकर हे तरकारी घेऊन उरुळी कांचनकडे चालले होते, तर दीपक ताम्हाणे हा ताम्हाणवाडीकडे घरी चालला होता. सकाळी सहाच्या दरम्यान अपघात झाल्याने घटनास्थळी कोणी त्वरित येऊ शकले नाही. हा अपघात सरपंच सविता भोसेकर यांच्या बंगल्यानजीक झाला. सविता यांच्या सासूबाई या बाहेर येऊन त्यांनी आरडाओरड करून लोक जमा केले. दत्तात्रेय यास डोक्यास गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला होता. या अपघाताने ताम्हणवाडी आणि बोरीऐंदी परिसरात शोककळा पसरली आहे.