In Jalgaon, farmers set fire to three acres of sugarcane

साखर कारखाने ऊस घेऊन जात नसल्या शेतकऱ्याने हताश होऊन मोठे पाऊल उचलले. भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारातील शेतकरी तायडे यांनी अखेर शेतातील तीन एकर ऊस पेटवून दिला आहे(In Jalgaon, farmers set fire to three acres of sugarcane).

    जळगाव : साखर कारखाने ऊस घेऊन जात नसल्या शेतकऱ्याने हताश होऊन मोठे पाऊल उचलले. भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारातील शेतकरी तायडे यांनी अखेर शेतातील तीन एकर ऊस पेटवून दिला आहे(In Jalgaon, farmers set fire to three acres of sugarcane).

    जळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या मोठी बनली आहे. यावर्षीचा गळीत हंगाम संपत आलेला असून देखील शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये पाऊस तसाच पडून आहे.

    जळगाव जिल्ह्यात चार साखर कारखाने असून त्यापैकी सद्यस्थितीला मुक्ताईनगरचा मुक्ताई शुगर हा एकमेव साखर कारखाना सुरु आहे.

    मुक्ताई शुगर ने ऊसाची नोंद घेऊन देखील ऊस नेला नसल्यामुळे भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारातील शेतकरी चंद्रकांत तायडे यांनी शिवारातील तीन एकर ऊस अखेरीस पेटवून दिला आहे.

    ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की सरकारने काहीतरी भरपाई जळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला दिली पाहिजे.