जालना लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा

महाविकास आघाडीला मजबुती आणणारी आणि महायुतीला धक्का देणारे राजकारण जालन्यामध्ये घडत आहे.

    जालना – लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी देशभरामध्ये सुरु आहे. एकूण सात टप्प्यामध्ये होणारे मतदानातील तीन टप्पे पार पडले आहेत. यानंतर आता लवकरच चौथा मतदानाचा टप्पा देखील पार पडणार आहे. त्यापूर्वी जालन्याच्या राजकारणामध्ये मोठी घडमोडी घडलेली आहे. महाविकास आघाडीला मजबुती आणणारी आणि महायुतीला धक्का देणारे राजकारण जालन्यामध्ये घडत आहे.

    जालन्यामध्ये महाविकास आघाडीकडून डॉ.कल्याण काळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जालन्यामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत होणार आहे. आता मात्र डॉ.कल्याण काळे यांची ताकद वाढली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

    आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ही घोषणा करण्यात आली आहे. डॉ.कल्याण काळे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही प्रश्न मांडले आणि सर्व मागण्या डॉ.कल्याण काळे यांनी मान्य केल्याने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितले आहे.