कल्याण ट्रॉफी’ स्केटिंग स्पर्धेत मिरा भाईंदर विजेते तर बदलापूर उपविजेता

सर्व विजेत्या संघाना कल्याण ट्रॉफी आणि खेळाडूंना सुवर्ण रोप्य आणि कास्य पदक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मुंबई विभागामधून २४६ खेळाडुंनी सहभाग घेऊन स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला.

    कल्याण : स्केटिंग असो. ऑफ कल्याण तालुका व रीजन्सी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रीजन्सी अंटालिया शहाड येथे ७ वी कल्याण ट्रॉफी खुली स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मिरा भाईंदरच्या स्केटलाईफ स्पीड स्केटिंग अकॅडमी ने ७२ गुण घेत स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले तर बदलापूरच्या इंडियन स्कूल ऑफ स्केट क्लब ने ६८ गुणांसह स्पर्धेचे उपविजेते पदाचा मान मिळवला. तर कल्याण च्या सागर क्लब ने तृतीय स्थान पटकावले.

    सर्व विजेत्या संघाना कल्याण ट्रॉफी आणि खेळाडूंना सुवर्ण रोप्य आणि कास्य पदक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मुंबई विभागामधून २४६ खेळाडुंनी सहभाग घेऊन स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. स्पर्धा स्केटिंगच्या ५ विविध प्रकारात खेळवण्यात आली. स्पर्धेचे उदघाटन रीजन्सी ग्रुपचे मनीष रूपचंदानी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. याMumbai प्रसंगी पप्पू सैनी, रफिक शेख, मोहित बजाज, गितेश वैद्य व मनीषा गावकर उपस्थित होते. स्पर्धेला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रफिक अन्सारी, गणेश बागुल, संतोष मिश्रा, सागर कुलदीप, मितेश जैन, आयप्पा नायडू, गुफ्रान शेख, तानिया भाटिया, अथर्व गावकर, दीपक कुलदीप यांनी परिश्रम घेतले.

    अन्विता बूटे, जैस्वी नायर, मोहममद इब्राहीम शेख, जियाना शेट्टी, अर्जुन कामत, आध्या कामत, रेवा खेडेकर, पारथी परमार, देवांश प्रधान, रुद्रांश दास, हर्षिका विवेक रस्तोगी, अजीता जियाल, चाहत मुकेश पाइन या खेळाडुंनी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तर प्रजना पाइन, फराझ अन्सारी, प्रेक्षा टेकरीवाल, जियान प्रजापती, रेयांश गायकवाड, राफे काझी, अद्वैत दळवी, ट्विशा जव्हेरी, जिया जियाल, दव विश्वकर्मा, अर्जित जोयशी, गोहिल शौर्य, सॅम जॉर्ज, करुण्या पतंगे यांनी रौप्य पदक आणि सिध्देश भोसले, दिव्यांश जियाल, कावेश दत्ता, आकृति झा, झैन काजी, अरमान सय्यद, ध्रुवीका रावराणे या खेळाडुंनी कास्य पदक पटकावले.