काटेवाडी (ता. खटाव) येथे शहीद जवान महेश आत्माराम कचरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काटेवाडी गाव विधवा मुक्त झाले. खटाव तालुक्यातील तिसरे विधवा मुक्त गाव होण्याचा मान काटेवाडी या गावाला मिळाला. शहीद जवान महेश आत्माराम कचरे यांना आदरांजली म्हणून गाव विधवा मुक्त करून आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुसेगाव : काटेवाडी (ता. खटाव) येथे शहीद जवान महेश आत्माराम कचरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काटेवाडी गाव विधवा मुक्त झाले. खटाव तालुक्यातील तिसरे विधवा मुक्त गाव होण्याचा मान काटेवाडी या गावाला मिळाला. शहीद जवान महेश आत्माराम कचरे यांना आदरांजली म्हणून गाव विधवा मुक्त करून आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जयहिंद फाउंडेशनच्यावतीने ग्रामसेविकांना वडूज येथील मिटींगमध्ये विधवा मुक्त काटेवाडीचे पत्र देण्यात आले. शहीद जवान महेश आत्माराम कचरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त यांचा पाठपुरावा करून कार्यक्रमात किर्तन सोहळ्यानंतर जयहिंद फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता किसन फडतरे यांना बोलण्याची संधी दिली. त्यावेळी विधवा प्रथा. त्याचा महिलांना होणारा त्रास व विधवा मुक्ती काळाची कशी गरज आहे. हे त्यानंी पटवून दिले. नंतर काटेवाडी विधवा मुक्त करायचे का? हात वर करुन अनुमती द्यावी म्हणताच १००टक्के स्त्री पुरुष यांनी हात उंचावून सम्मती दिली. यानंतर फडतरे मयांनी तीन वेळा काटेवाडी विधवा मुक्तीचा जयघोष केला. टाळ्या वाजवून सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी फाउंडेशनच्या हेमलता किसन फडतरे, उपाध्यक्षा संगीता धनंजय जाधव, पुनम यशवंत साळुंखे, खजिनदार रिया संजय काटकर, वीर पत्नी रेखा किसन कदम, गारवडी, वीर पत्नी पुनम चंद्रकांत जाधव, काताळगेवाडी, किसन मुगुटराव फडतरे, फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते.सर्वत्र अनुकरण होण्याची गरज
वीरपत्नी रूपाली महेश कचरे यांचे एक वर्षापूर्वी याच दिवशी पुसले गेलेले हळदकुंकू एक वर्षाने जयहिंद फाउंडेशनच्यावतीने लावले गेले. उपस्थित सर्व लोकांनी या निर्णयाचे कौतुक करीत सर्वत्र अनुकरण होण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

हळदी कुंकू लावून ओटी भरली
गावातील उपस्थित विधवा महिलांना हळदीकुंकू लाऊन ओटी भरण्यात आली. हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या. त्याचवेळी वीरपत्नी रूपाली महेश कचरे यांना जयहिंद फाउंडेशनच्यावतीने हिरवी साडी व पिस देऊन ओटी-नारळ हिरव्या बांगड्या, चुडे, मणीमंगळसूत्र, जोडवी हे सौभाग्य अलंकार देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व महिलांनी वीरपत्नी रुपाली यांना हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली.