सांगलीत ‘पुष्पा’ची पुन्हा करामत; केदारवाडीत तब्बल एक कोटीचे रक्तचंदन जप्त

सांगली जिल्ह्यात पुन्हा आणखी एक 'पुष्पा' (Pushpa) पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथे चक्क घरात एक कोटीचे चंदन ठेवले होते. वर्षभरात सांगली जिल्ह्यात दुसऱ्यांदा मोठा साठा सापडल्याने सांगली जिल्हा हा चंदन तस्करीचा (Sandal Smuggler) सिंधीकेट बनत चालला आहे.

    इस्लामपूर : सांगली जिल्ह्यात पुन्हा आणखी एक ‘पुष्पा’ (Pushpa) पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथे चक्क घरात एक कोटीचे चंदन ठेवले होते. वर्षभरात सांगली जिल्ह्यात दुसऱ्यांदा मोठा साठा सापडल्याने सांगली जिल्हा हा चंदन तस्करीचा (Sandal Smuggler) सिंधीकेट बनत चालला आहे.

    राष्ट्रीय महामार्गालगत केदारवाडी (ता.वाळवा) येथे एका घरात बेकायदेशीर साठा केलेले तब्बल एक कोटीचं रक्तचंदन कासेगाव पोलिसांनी छापा टाकून जप्त केले. संशयित विजय बाळासाहेब तांबवे (रा.केदारवाडी ) याला अटक केली. कासेगाव पोलीस व वनविभाग यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. कासेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी, केदारवाडी येथील जयकर तुकाराम पाटील यांचे मालकीचे घरात युनस भैय्या व विजय बाळासाहेब तांबवे (रा. केदारवाडी) यांनी रक्तचंदन लाकडाचा बेकायदेशीर साठा केला होता. हे ओंडके बेकायदेशीरपणे विक्री करणेच्या उद्देशाने आणल्याची बातमी कासेगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला लागली होती. या पथकातील कर्मचारी आनंद देसाई, अनिल पाटील, दीपक घस्ते, दीपक हांडे यांना ही माहिती मिळाली होती. याची सूचना त्यांनी वरिष्ठांना सांगितली.

    पोलीस अधिक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव, आर. पाटील, माणिक मोरे, कुमार शेणेकर, अनिल पाटील, दीपक हांडे, विजय पाटील, सचिन चव्हाण, सुरेंद्र पाटील, संग्राम कुंभार, जयकर सुतार, अविनाश लोहार, सचिन पाटील, संदीप सावंत, शरद कुंभार, दिपक घस्ते, आनंदा देसाई, तुषार जाधव, संजय गलगुडे, दिपक पवार, दिपक शिंदे, विशाल भोसले, वैशाली मोरे वन विभाग पथकाकडील वनअधिकारी महिला वनरक्षक एस.टी. वाघमारे, व्ही. व्ही. डुबल व त्यांच्या पथकाने छापा टाकला.

    जयकर तुकाराम पाटील (रा.केदारवाडी ता.वाळवा) याचे मालकीचे घरात 758.40 किलो वजनाचे रक्तचंदनाची एकूण 20 लाकडी ओंडके आढळून आले. त्यांचे सध्याचे बाजारभावाप्रमाणे 91 लाख 800 रुपये किंमत आहे. यावेळी संशयित विजय बाळासाहेब तांबवे यास ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत पवार करत आहेत.