संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

खानापूर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. सर्वत्र दहा तासांहून अधिक काळ पावसाने जोरदार बॅटिंग केली. अचानकपणे पडलेला पाऊस रब्बी हंगामातील पिकांना दिलासा देणारा आहे. मात्र फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे.

    सांगली : खानापूर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. सर्वत्र दहा तासांहून अधिक काळ पावसाने जोरदार बॅटिंग केली. अचानकपणे पडलेला पाऊस रब्बी हंगामातील पिकांना दिलासा देणारा आहे. मात्र फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. आळसंदमध्ये प्राचीन कालीन असलेल्या मंदिराच्या शिखरावर वीज कोसळली आहे. मंदिराचे नुकसान झाले आहे. आळसंद परिसरात इतिहासाचा मूकसाक्षीदार असलेल्या मंदिराचे नुकसान झाले आहे.‌ वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऊसाचे नुकसान झाले आहे. ऊस जमीनदोस्त झाला आहे.

    तालुक्यात बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. सलग दहा तास पावसाने जोरदार लावली. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज अचानक हजेरी लावली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, शाळू पिकांना पाऊसामुळे दिलासा मिळाला आहे.‌ शेतकऱ्यांनी शाळूची पेरणी केली आहे. त्या पिकाला दिलासादायक आहे. पावसाने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. परिणामी, कोरडवाहू शेतकऱ्यांंमध्ये आंनदाचे वातावरण आहे. तालुक्यातील लेंगरे, माहुली यासह घाटमाथ्यावरील खानापूर, भिवघाट, बेणापूर, सुलतानगादे, बलवडी, हिवरे, पळशी भागातील बहुतांशी द्राक्ष बागा फुलोराच्या अवस्थेत आहेत. जोरदार पावसाने द्राक्ष बागातील द्राक्ष बागांना घडांना पावसाचा मारा लागला आहे.‌ परिणामी मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.

    पावसाने ऊसतोड ठप्प

    आळसंद परिसरात बहुतांशी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत.‌ अचानकपणे आलेल्या पावसाने ऊसतोड ठप्प झाली आहे. ऊसाच्या सरीत पाणी साचले आहे.‌ परिणामी, ऊसतोड बंद आहे. ऊसतोड मजुरांच्या झोपड्यात पाणी साचले आहे.‌ अजून दोन – तीन दिवस तरी ऊसतोड सुरू होणे शक्य नाही. या कालावधीत ऊसतोड मजुरांची अडचण होण्याची शक्यता आहे..