कोल्हापुरात 50 हजारांच्या टोमॅटोवर डल्ला, पाऊस आणि अंधारांचा फायदा घेत क्रेट लांबवले; घटना CCTV मध्ये कैद

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील टोमॅटोची चोरी झाल्याचे समोर येत आहे. येथे शेतातील 50 हजारांच्या टोमॅटोंवर चोरट्यांनी डल्ला मारला आहेत. शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतातली 50 हजारांच्या टोमॅटोची चोरी झाली आहे.

    कोल्हापूर : सध्या टोमॅटोला चांगला भाव आला आहे. त्यामुळे अनेकांच्या ताटातून आता टोमॅटोच गायब झाला आहे. तर त्याच्या महाग होण्यावर सोशल मीडियात अनेक रिल्स सध्या धुमाकूळ घालत आहेत. मात्र लाल टोमॅटोला आता सोन्याचा भाव आल्याचं दिसत आहे. कारण टोमॅटोच्या किमतीने १०० ते १२० रूपयांवरून थेट २०० च्या घरात मुंबईत गेले आहेत. तर आता चोरांनी त्यांचा मोर्चा टोमॅटोकडे वळवला आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील टोमॅटोची चोरी झाल्याचे समोर येत आहे. येथे शेतातील 50 हजारांच्या टोमॅटोंवर चोरट्यांनी डल्ला मारला आहेत. शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतातली 50 हजारांच्या टोमॅटोची चोरी झाली आहे. या टोमॅटो चोरट्यांनी वीस गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो चोरुन नेले आहे.

    अशोक मस्के यांच्या शेतात टोमॅटोचे पीक घेण्यात आले होते. अंधार आणि पावसाचा फायदा घेत तसेच सीसीटीव्हीला चकवा देत चोरट्यांनी टोमॅटोची चोरी केली. या टोमॅटो चोरट्यांनी वीस गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो चोरुन नेले आहे. अंधाराचा फायदा उचलून टोमॅटो नेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून या प्रकरणी आता पोलीस तपास हा सुरु करत आहे.

    दरम्यान गोंदिया शहरात एका भाजी विक्रेत्याच्या दुकानातून देखील टोमॅटो चोरीला गेल्याची घटना घडली आहे. जवळपास तीन ते चार हजार रुपयाचे टोमॅटोसह मिरची आणि रोकड ही चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये दिली. टोमॅटो चोरीची ही घटना बाजारपेठेतील दुसऱ्यांदा घडली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून चोराला अटक केली आहे.