तहसिल कार्यालयात कुणबी प्रमाण पत्राची शोध घेताना कर्मचारी वर्ग छायाचित्रात दिसत आहे. (छाया- शिवाजी पुजारी, मंगळवेढा)
तहसिल कार्यालयात कुणबी प्रमाण पत्राची शोध घेताना कर्मचारी वर्ग छायाचित्रात दिसत आहे. (छाया- शिवाजी पुजारी, मंगळवेढा)

 मराठा आरक्षण बाबत कुणबी प्रमाणपत्र तपासणी साठी जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार मंगळवेढा तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करून यूध्द पातळीवर शोध मोहीम सुरू आसल्याची माहीती तहसिलदार मदन जाधव यांनी दिली.

    मंगळवेढा: मराठा आरक्षण बाबत कुणबी प्रमाणपत्र तपासणी साठी जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार मंगळवेढा तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करून यूध्द पातळीवर शोध मोहीम सुरू आसल्याची माहीती तहसिलदार मदन जाधव यांनी दिली.

    तहसील कार्यालयाच्या नक्कल विभागात उपलब्ध असलेले मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावातील दप्तर तपासणी सुरू असुन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुणाकडे कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी या संदर्भांतील कागदपत्रे उपलब्ध असतील तर त्याची वैधता तपासणीसाठी घेऊन यावे.कागदपत्रे मोडी लिपीतील असतील तरी तपासून घेण्यात येतील.अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.