राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार, भितीचे वातावरण

    गेले काही दिवस तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असुन त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे धाऊलवल्ली येथे बिबट्याने दोन वर्षाच्या दोन वारसान्ना ठार केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यान्नी घटनास्थळी जावुन पहाणी केली.

    तालुक्यात बिबट्याचा संचार वाढला आहे. गतवर्षी एका महिला अधिकाऱ्यांवर बिबट्याने झेप घेतल्याची घटना घडली होती काही दिवसांपुर्वी पहाटेच्या वेळी राजापूर पोलीस ठाण्याच्या वऱ्हांड्यात घुसुन बिबट्याने एक कुत्रा पकडुन नेल्याचे तेथील सीसीटीव्हीत कैद झाले होते त्यानंतर सौंदळ येथे रात्रीच्या वेळी शेतात कामानिमित्त बाईकवरुन चाललेल्या दिपक चव्हाण या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केले होते काही ठिकाणी बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर येत आहेत दोन दिवसांपुर्वी तालुक्यातील धाऊलवल्ली येथील नित्यानंद लिंगायत यांची  दोन वर्षांची दोन वासरे बिबट्याने ठार केल्याची घटना घडली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यान्नी घटनास्थळी जावुन प्रत्यक्ष पहाणी केली आहे.

    तालुक्यात बिबट्याचा संचार वाढला असुन राजापूर शहरात तर रात्री, मध्यरात्रीच्या वेळी त्याला अनेकान्नी पाहिल्याचे सांगितले बिबट्याचा वावर वाढल्याने प्रचंड घबराट पसरली आहे. मात्र असे असताना देखील वनविभाग बघ्याच्या भुमिकेत आहे. व्हेल माशाच्या उलटी तस्करीच्या कथीत प्रकरणी वनविभागाच्या भोंगळ कारभाराचा पर्दापाश झालेला असताना वनविभागावर या प्रकरणाचा बनाव केल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतुन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजापूर शहरासह संपुर्ण तालुक्यात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भीतीचे वातावरण असताना वनविभाग बघ्याची भुमिका घेत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.