मुंबईत पावसामुळे भाज्यांची आवक घटली; दरांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

  मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे (Rain) शेतीचं मोठं नुकसान झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. पावसामुळे मुंबईत (Mumbai) भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असून भाज्यांच्या दरांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांमधून भाज्यांचा (Vegetables) पुरवठा होत असतो. नाशिक, पुणे, गुजरातहून मुंबईत भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. मुंबई सह आसपासच्या शहरांमधील भाजी मार्केटमध्ये राज्यभरात कोसळत असलेल्या पावसामुळे आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. नाशिक, पुणे, गुजरातहून भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या कमी झाल्या आहेत तर पावसामुळे अनेक भाज्या लवकर खराब झाल्या आहेत. काहीच दिवसात नवरात्रोत्सव सुरु होणार असल्याने अनेक जण ९ दिवस उपवास करतात, अथवा मांसाहार खाणे टाळतात. अशा परिस्थितीत भाज्यांचा तुटवडा आणखीनच भासु शकतो.

  पावसामुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे जोपर्यंत पूर्वीप्रमाणे भाज्यांची आवक मार्केटमध्ये पूर्ववत होत नाही तोपर्यंत हे दर वाढलेले पाहायला मिळतील, असे भाजी विक्रेत्यांनी संघितले. आहे.

  भाज्यांचे दर (प्रति किलो) :

  भाजी                आताचे दर                   आधीचे दर
  भेंडी                 ४० रुपये                    २६ रुपये किलो
  टोमॅटो              ४० रुपये                 २४ रुपये किलो
  कोथिंबीर जुडी   ६०-७० रुपये           २५ रुपये किलो
  मेथी जुडी               ७० रुपये             २०ते २५ रुपये
  पालक जुडी            ५० रुपये               २० रुपये किलो
  फ्लॉवर                   ६०रुपये               २६ रुपये किलो
  ढोबळी मिरची        ९० रुपये               ४० रुपये किलो
  गवार                  ६० रुपये किलो          ३० रुपये किलो
  लिंबू                       ३० ते ४०रुपये           ९० ते १०० किलो