‘ईडीच्या कारवाईचे राजकारण भाजपला भविष्यात परवडणारे नाही’; राज ठाकरेंचे सूचक विधान

लबंदी प्रकरणावर देखील राज ठाकरे यांनी त्यांची मागणी स्पष्ट केली. तसेच भाजपवर देखील जोरदार निशाणा साधला. ईडीच्या कारवाई जे  सत्र सुरू आहे,भविष्यात हे भाजपला देखील परवडणारे नाही. असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. 

    नाशिक: लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभेच्या तयारीचा शंख फुंकला आहे. निवडणुकीच्या तयारीबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मनसेच्या (MNS) टोलबंदी प्रकरणावर देखील राज ठाकरे यांनी त्यांची मागणी स्पष्ट केली. तसेच भाजपवर (BJP) देखील जोरदार निशाणा साधला. ईडीच्या (ED) कारवाई जे  सत्र सुरू आहे,भविष्यात हे भाजपला देखील परवडणारे नाही. असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

    राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना आगामी निवडणूकीच्या तयारीबद्दल माहिती दिली. राज ठाकरे म्हणाले, “लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा झाली, प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवली पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, लवकरच निर्णय घेऊ.ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सगळे तयारी करत आहेत. सगळे शांत झाले की,मी पण लवकरच अयोध्येमध्ये जाईन. आणि आपल्याकडे काळाराम मंदिर आहेच मी तिथे दर्शनासाठी जाईन.” असे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी पूर्वी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिल्यामुळे यंदा देखील मोदींना पाठिंबा दर्शवणार का असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना राज म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान व्हावा असे मी म्हणाले होतो, आता मी चाचपणी करतोय. आणि महाविकासआघाडीमध्ये मी कशाला जाईन तिथे काय आहे?” असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले आहे.

    सत्ताधारी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत असतात. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, “देशभरात केंद्रीय तपास यंत्रणाकडून ज्या कारवाया सुरू आहेत. ते पाहता हे राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही, असे दिसते. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नसतं. उद्या जेव्हा सत्ताबदल होईल, तेव्हा पलीकडच्या बाजूनेही दामदुपटीने कारवाई होईल, तेव्हा काय कराल? इंदिरा गांधींच्या काळातही असंच झालं होतं, पण त्या काळात झालं म्हणून आपणही तेच करायचं, हे योग्य नाही. राजकारण्यांना जोपर्यंत मतदार वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत हे असेच सुरू राहणार” असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले.

    टोल नाही तर टोल वसुली ही खरी गोष्ट

    राज ठाकरे यांनी राज्यभरामध्ये टोलवसुली हा विषय लावून धरला आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी जे बोलतो ते कडवट वाटते नंतर ते सत्य आहे हे लक्षात येईल. माझा टोलला विरोध नाही.  टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते त्याचा विरोध आहे. याबाबत स्पष्टता नाही. विषय टोल नाही तर टोल वसुली आहे. पैसे भरून झाले की नाही हे लोकांना कधी कळेल.  मुंबई पुणेच्या हायवेवर किती पैसे वसूल झाले आहेत. याबाबत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी ठेवणार आहे. टोलवसुलीचे पैसे टोल वाल्याच्या खिशात जात आहेत. किंवा त्याच्या खिशातील पैसे राजकीय पक्षाच्या फंडात जाणार हे चालेल का ? खड्डे जर असतील तर टोल कशासाठी? कोकणचा रस्ता पूर्ण नाही तरी तिथे एक टोल आहे. ट्रान्सहार्बर रोड वर चांगले कॅमेरे, मग टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे राज्य सरकार आणि खाजगी माणसाच्या खिशात पैसे जातात हे बघायला पाहिजे? असे गंभीर सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केले.