In Oman, a senior engineer lost Rs 12 lakh

अनिकेतवर विश्वास ठेवून राजेशने त्याला भंडारा येथील एक्सिस बँकेच्या खात्यातून तीन लाख ५९ हजार रुपये पाठविले. नंतर विविध खात्यांतून १० लाख ५४ हजार रुपये पुन्हा पाठविण्यात आले. नंतरही पुन्हा पैशाची मागणी झाली तर आईच्या भंडारा येथील ॲक्सिस बँकेच्या खात्यातून २७ जून रोजी दोन लाख १५ हजार रुपयांचे आरटीजीएस केले. अशा प्रकारे एकूण १२ लाख ६९ हजार रुपये खात्यात पाठविले.

    भंडारा : ओमानमध्ये (Oman) मोठ्या पदावर  कार्यरत असलेल्या एका अभियंत्याला त्याच्याच मित्राने १२ लाख ६९ हजार रुपयांचा ऑनलाईन (12 lakh 69 thousand online) प्रकरणात गंडविल्याचा प्रकार भंडारा (Messed up in the case) येथे उघडकीस आला आहे. काही महिन्यांपूर्वी फोनद्वारे मैत्री वाढविलेल्या अनिकेत गुप्ते (आरोपी ) याने मित्र  राजेशकुमार सिंग (४२)  याला  मी दिल्ली विमानतळावर आलो आहे असे सांगितले.

    राजेश ला ते खरे वाटले. अनिकेत म्हणाला, माझ्याकडे सध्या दोन लाख पाऊंडचा चेक (check for two million pounds) आहे. तसेच, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी (immigration officials) मला पकडले आहे. माझ्याकडे पैसे जास्त असल्याने माझ्यावर मनी लाँड्रिंगची (money laundering) केस होऊ शकते. तर हा चेक क्लिअर करण्यासाठी मला पैशाची गरज आहे. विश्वास बसण्यासाठी अनिकेतने त्यावेळी तेथील इमिग्रेशन ऑफिसर सुमन विवेक, विदेशी चलन बदल अधिकारी तन्वी खुराणा, रॉयल बँक ऑफ स्कॉटलँडचे व्यवस्थापक संतोष मारीसन आणि मारिया टेरेसा या सर्व अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणे करून दिले. त्या सर्वानी असे सांगितले की जर तुम्ही पैसे दिले तर आम्ही अनिकेतला सोडून देऊ.

    अनिकेतवर विश्वास ठेवून राजेशने त्याला भंडारा येथील एक्सिस बँकेच्या खात्यातून तीन लाख ५९ हजार रुपये पाठविले. नंतर विविध खात्यांतून १० लाख ५४ हजार रुपये पुन्हा पाठविण्यात आले. नंतरही पुन्हा पैशाची मागणी झाली तर आईच्या भंडारा येथील ॲक्सिस बँकेच्या खात्यातून २७ जून रोजी दोन लाख १५ हजार रुपयांचे आरटीजीएस केले. अशा प्रकारे एकूण १२ लाख ६९ हजार रुपये खात्यात पाठविले. तरी, अनिकेतने पुन्हा सात लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा राजेशला शंका आली. तसेच आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्याने वडिलांद्वारे भंडारा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.