In Osmanabad district, a bike caught fire during the NCP agitation

उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वतीने महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी स्टंटबाजी अंगाशी आली असती पण नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही दुर्घटना घडली नाही(In Osmanabad district, a Bike Caught Fire during the NCP Agitation).

    पेट्रोल , डिझेलच भाव गगणाला भिडले असुन गॅसची दरवाढ सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरत आहे. या विरोधात राष्ट्रवादीने मोटारसायकल बैलगाडीत घालुन व डोकेदुखीचा उपाय म्हणुन झेंडू बामचे वाटप करत जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले.

    मात्र, आंदोलनानंतर आधिक स्टंटबाजी करताना कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवर पेट्रोल ओतले. इतक्यात कोणीतरी एका कार्यकर्त्याने आगपेटीची काडी पेटवली आणि क्षणात बाईकने मोठा पेट घेत भडका उडाला. त्यामुळे गाडीजवळ असलेल्या कार्यकर्त्यांची धांदल उडाली मात्र नशिब बलवत्तर म्हणुन काही अनर्थ घडला नाही.