ससूनमध्ये पार्किंगच्या नावाखीली लूट, 5 रुपये शुल्क आसतना 10 रुपयाची वसूली; स्टिंग ऑपरेशनमधून प्रकार उघडकीस

गोर गरीब नागरिकांसाठी नवसंजीवनी असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात दुचाकी पार्किंग करताना गरीब नागरिकांची न कळत दररोज हजारो रुपयांची लूट होत असल्याचे स्टिंग ऑपरेशन मधून आढळून आले आहे.

    पुणे : गोर गरीब नागरिकांसाठी नवसंजीवनी असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात दुचाकी पार्किंग करताना गरीब नागरिकांची न कळत दररोज हजारो रुपयांची लूट होत असल्याचे स्टिंग ऑपरेशन मधून आढळून आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयाच्या आवारात येणाऱ्या नागरिकांसाठी, माणिकचंद हृदय इन्स्टिट्युट च्या मागे, समाजसेवा विभाग बाहेर, बाहेर जाण्याच्या गेट जवळ अश्या तीन ते चार ठिकाणी पे अँड पार्क चे कंत्राट दिले आहे. येथील कांत्राटदार हे दुचाकी पार्किंग करणाऱ्या नागरिकांकडून १२ तास साठी १० रुपये आणि पहिल्या दोन तासांसाठी ५ रुपये, १२ तास च्या पुढे २४ तास १५ रूपये प्रमाणे ची पावती देण्याचा नियम असून, हे कंत्राट दर मात्र नागरिकांकडून एका गाडी मागे थेट १० रुपयेच पैसे घेतात.

    पावतीवर अगदी लहान अक्षरात पहिल्या दोन तासांसाठी ५ रुपये असे लिहलेले आहे. मात्र सरसकट दहा रुपये घेतल्याने नागरिक पुढे विचारातच नाही. आणि पावतीची रक्कम असलेल्या ठिकाणी तारखेचा शिक्का मारला जातो त्यामुळे ५ रुपये दिसतच नाही.

    अगदी कोणी विचारलेच तर पार्किंग वाले सांगतात की , दहा रुपयेच द्यावे लागतील, दोन तासांमध्ये या आणि परत ५ रूपये घेऊन जा. मात्र अनेक नागरिक रुग्णांच्या टेन्शन मुळे ५ रुपये विसरून जातात. आणि कोणी ५ रुपयाची मागणी केलीच तर प्रत्येकी एक रुपयांची चार नाणे दिले जाते आणि नागरिक घाईत असल्याने एक रुपया कमी दिला आहे याकडे पाहताच नाही.

    कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात येत असून, त्याजागी नवीन कंत्राट देण्यात येणार आहे. या प्रक्रियाची सुरवात करण्यात आली आहे.

    - डॉ. किरण कुमार जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय