शिरपूर तालुक्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी- आ. काशिराम पावरा

    शिरपूर : शिरपूर तालुक्यात (Shirpur Taluka) वादळी पावसाने (Heavy Rain) झालेल्या नुकसानग्रस्त भागातील पंचनामे (Punchnama In The Damaged Area) करुन शासनाने व विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने असे दोन्ही प्रकारे नुकसान भरपाई (Compensation) द्यावी अशी मागणी आ. काशिराम पावरा (Mla Kashiram Pavara) यांनी केली आहे.

    तालुक्यातील शिरपूर, होळनांथे, थाळनेर, बोराडी, सांगवी, जवखेडा, अर्थे या सर्व सात सर्कल मध्ये शासनाने “स्कायमेट वेदर” रडार मशिन बसविले असून यावर हवामान नोंदी नियमितपणे घेण्यात येतात. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्यामार्फत तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी फळपिक विमा काढला आहे.

    शिरपूर तालुक्यातील सर्व सर्कल मध्ये असलेल्या शासकीय रडार यंत्रणेवरील रिडिंग (नोंदी) ग्राह्य धरले जातात. शेतकरी बांधवांसह राज्य सरकार व केंद्र सरकार संबंधित विमा कंपनीला विमा हप्ता भरते. त्यादृष्टीने शासनाने व विमा कंपनीने तातडीने शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई करुन विमा रक्कम अदा करावी अशी मागणी आमदार काशिराम पावरा यांनी केली आहे.

    तालुक्यातील अनेक गावांमधील केळी तसेच इतर अनेक बागायती पिकांचे परवा झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने व पंतप्रधान फळपीक विमा योजने अंतर्गत नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी केली आहे.

    यासाठी महसूल प्रशासन, कृषी विभाग व पिक विमा कंपनीने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने करावे असे काशिराम पावरा यांनी कळविले आहे.