राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण, औद्योगिक विकासासाठी शासन तत्पर – मुख्यमंत्री

राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून, (Industry sector in the development of the state) औद्योगिक विकासासाठी शासन (State government) सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) यांनी आज येथे दिली.

    औरंगाबाद : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे (Maharashtra Chamber of Commerce Industries and Agriculture ) आयोजित राज्यस्तरीय व्यापार महापरिषदेचे आज उद्घाटन मुख्यमंत्री (CM eknath shinde) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून, (Industry sector in the development of the state) औद्योगिक विकासासाठी शासन (State government) सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) यांनी आज येथे दिली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय उद्योग गुंतवणूकीच्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मिती करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    दरम्यान, औरंगाबाद परिसराच्या विकासासाठी समृद्धी महामार्गासह गतिमान दळणवळण व्यवस्था, वीज, पाणी, जमिनी आदी पायाभूत सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे. विकासाला सहाय्यभूत ठरू शकणाऱ्या कृषीपूरक उद्योगांनाही चालना देण्यात येत आहेत, यासाठी प्राधान्याने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतीनंतर रियल इस्टेट हा मोठा व्यवसाय असल्याने उद्योग धोरणात त्यादृष्टीने सुलभ बदल करण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येत आहेत.