तासगाव तालुक्यात २ थेट सरपंचासह २० सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब, ग्रामपंचायत निवडणुक निकाल ; गुलाबाची उधळण फटाक्यांची आतषबाजी

तासगांव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेनंतर २ थेट सरपंचासह २० सदस्य निवडीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाला. निकाल जाहिर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून व फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.

  तासगाव : तासगांव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेनंतर २ थेट सरपंचासह २० सदस्य निवडीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाला. निकाल जाहिर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून व फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.

  तासगांव तालुक्यातील चिखलगोठण, बिरणवाडी या दोन ग्रामपंचायतीसह डोंगरसोनी येथील चार जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यापैकी बिरणवाडी येथील एका सदस्यांची बिनविरोध निवड अगोदरच झाली आहे तर उर्वरित थेट सरपंच व आठ सदस्य, तसेच चिखलगोठण येथील थेट सरपंच व सात सदस्य, डोंगरसोनी येथील पोटनिवडणुकीतील चार सदस्य, अशा एकूण दोन सरपंच १९ सदस्य निवडीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी ८३.३६ टक्के मतदान झाले.

  सोमवारी तहसिलदार रविद्र रांजणे यांच्यासह नायब तहसिलदार धनश्री स्वामी यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळी १० च्या दरम्यान सुरू झालेली ही प्रक्रिया अवघ्या एका तासात पूर्ण झाली.

  यावेळी निवडून आलेले गाव निहाय थेट सरपंच व सदस्य, त्यांना मिळालेली मते अशी,

  चिखलगोठण- थेट सरपंच-मंगल संजय पवार ६७८ सदस्य प्रभाग एक-संपत घोडी कदम- ३२६, आयेशा असलम शिकलगार ३५७, पुष्पा विश्वनाथ पवार- ३३६, प्रभाग दोन- राजकुमार संभाजी जाधव – १९२. मिनाताई मारुती पवार- १८५, प्रभाग तीन संभाजी जगन्नाथ साठे – १२६. रंजना उध्दव पवार – १२७.

  बिरणवाडी थेट सरपंच – उमेश उत्तम मोरे – ५६१, सदस्य- प्रभाग एक- पांडुरंग धोंडीराम मोरे- १७५, राणिका शंकर मोरे-१९०, विद्या श्रीकांत मोरे- १६५, प्रभाग दोन- अशोक विठोबा मोरे- १७७, भारती शहाजी मोरे- १८०, प्रभाग तीन- जयवंत कृष्णा मोरे – २००, नारायण राजाराम मोरे – २१५, ज्योती धोंडीराम मोरे- १९५, तर यापूर्वीच सुमन गजानन स्वामी यांची सदस्या म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ईश्वर चिठ्ठीने त्या विजयी.

  बिरणवाडी येथील प्रभाग एक मध्ये उमेदवार विद्या श्रीकांत मोरे व सुभद्रा शहाजी मोरे यांना प्रत्येकी १६५ अशी समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी उचलून विजयी उमेदवार निवडण्याचा निर्णय झाला. येथील सिफान अमिर मल्लाडे या छकुलीच्या हस्ते चिठ्ठी उचलून विदया श्रीकांत मोरे या विजयी उमेदवार म्हणून जाहिर करण्यात आहे.

  डोंगरसोनी-प्रभाग एक-सुर्यकांत दत्तात्रय झांबरे २५०, कोमल ऋषीकेश शिंदे-२५९,प्रभाग दोन- पौर्णिमा सचिन भोसले ३७४ प्रभाग तीन- सुषमा दिलीप झांबरे-३५६.

  मतमोजणी प्रक्रियेसाठी सुमारे १०० कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली होती. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस निरीक्षक सोमनाथ बाघ, स. पो. नि. बजरंग झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.