९ व्या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत मुलांमध्ये कर्नाटक तर मुलींमध्ये छत्तीसगड प्रथम

विजयी संघाला प्रथम २० हजार व चषक , द्वीतीय १० हजार व चषक तृतीय ७ हजार व चषक तर चतुर्थ ५ हजार व चषक तसेच तेवढीच वाढीव बक्षीस रक्कम आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या वतीने देण्यात आली.

    उस्मानाबाद : ९ व्या राष्ट्रीय लगोरी स्पर्धा उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक कर्नाटक संघाने तर मुलींमध्ये छत्तीसगड पटकावला, द्वितीय क्रमांक मुलांमध्ये महाराष्ट्राने तर मुलींमध्ये पोंडेचरीने मिळवला. तृतीय क्रमांकाचे पारितोषीक मुलांमध्ये पोंडेचरीने तर मुलींमध्ये तेलंगणाने मिळवले. चतुर्थ क्रमांक मुलात छत्तीसगड व मुलीत महाराष्ट्राला मिळाले.

    विजयी संघाला प्रथम २० हजार व चषक , द्वीतीय १० हजार व चषक तृतीय ७ हजार व चषक तर चतुर्थ ५ हजार व चषक तसेच तेवढीच वाढीव बक्षीस रक्कम आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या वतीने देण्यात आली. विजयी संघाला पारितोषीक वितरण माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी विजयी संघाने जल्लोष केला.