बदल्यांच्या माहोलमध्ये फिरस्त्याने उडवली पुणे पोलीस दलात खळबळ..! पोलीस कर्मचारी अन् अधिकाऱ्यांना फोन करून बदली करण्याची ऑफर; फिरस्त्या तरुणावर गुन्हा दाखल

पुणे शहर (Pune City) पोलीस (Police) दलात सध्या बदल्यांचा माहोल सुरू असतानाच एका फिरस्त्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडवून दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्याने फोन करून बदली करून देण्याची ऑफर दिली होती. या बदल्यांच्या फोनमुळे पोलीस दल हैराण तर झालेच होते पण उलट-सुलट चर्चा देखील सुरू होत्या. पण, तो खोडासळपणा असल्याचे समोर आणत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : पुणे शहर (Pune City) पोलीस (Police) दलात सध्या बदल्यांचा माहोल सुरू असतानाच एका फिरस्त्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडवून दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्याने फोन करून बदली करून देण्याची ऑफर दिली होती. या बदल्यांच्या फोनमुळे पोलीस दल हैराण तर झालेच होते पण उलट-सुलट चर्चा देखील सुरू होत्या. पण, तो खोडासळपणा असल्याचे समोर आणत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत गुन्हे शाखेचे ड्युटी ऑफीसर रूस्तुम इसाक मुजावर यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अमित जगन्नाथ कांबळे (वय ३५, रा. फिरस्ता) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ जानेवारी रोजी घडला असल्याचे पोलीस सांगत आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये कर्तव्यास आहेत. त्यांना अमित कांबळे याने फोन करून मी पोलीस निरीक्षक पाटील बोलत आहे. तुमची अगर तुमच्या ओळखीच्या कोणत्या कर्मचाऱ्याची बदली करायची आहे का, असे विचारत त्यांना बदलीसाठी काही रक्कम द्यावी लागेल असे ऑफर दिली होती. प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदारांनी तत्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ याची माहिती घेत खरा प्रकार उघडकीस आणला. तसेच, आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्याला सीआरपीसीनुसार नोटीस बजावण्यात आली आहे.

    दोन्ही किडण्या फेल…

    अमित कांबळे याच्या दोन्ही किडण्या फेल आहेत. तो ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. तो काही एक कामधंदा करत नाही. ससूनमध्ये त्याचे डायलिसीस सुरू असून, हे झाल्यानंतर तो फुटपाथवर येऊन राहतो. दरम्यान, त्याने यापुर्वीही असे प्रकार केल्याचे सांगण्यात आले आहे.