पोटनिवडणुकीत काँग्रेस रिंगणात, इच्छुकांची नावे दिल्लीला पाठविणार; पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली..!

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या निवडणुकीबाबत बोलताना भाजप तर्फे दिवंगत आमदार मुक्त टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना तिकीट दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते असे संकेत दिले होते. पण तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून उमेदवारंची यादी पाठविण्यात येणार आहे.

  पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार आहे. या निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची नावे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीतील हायकमांडला पाठवणार आहेत. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या जागेसाठी पाेटनिवडणुक होत आहे. कसबा विधानसभा हा काँग्रेससाठी पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांनी नाना पटोले यांनी भेट घेतली आहे. कसबा पोटनिवडणूकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  सोमवारी बैठक होणार
  कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी होणार आहे. यामध्ये या निवडणुकीवर प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी आहे. यामुळे ही जागा कोण लढविणार हे त्यापूर्वीच निश्चित करणे आवश्यक असल्याने ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

  राष्ट्रवादीकडून रुपाली पाटीलही उत्सुक
  २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपकडे आली. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत लढली होती. त्यात ही जागा कॉंग्रेसकडे गेली. शिवसेना नगरसेवकाने बंडखोरी करून अर्ज भरला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे; तर दुसऱ्या बाजूला या मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांनी पक्षाने आदेश दिल्यास आपण तयार असल्याचे जाहीर केले आहे.

  महािवकास अाघाडीच्या बैठकीकडे लक्ष्य
  विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या निवडणुकीबाबत बोलताना भाजप तर्फे दिवंगत आमदार मुक्त टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना तिकीट दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते असे संकेत दिले होते. पण तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून उमेदवारंची यादी पाठविण्यात येणार आहे. भाजपकडूनही या जागेसाठी अनेक जण गुडघ्याला बांशिग बांधून तयार आहेत. पण भाजपने जर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना तिकीट दिल्यास मविआसाठी अडचणीचे ठरु शकते आणि त्यांनी उभा केलेल्या उमेदवाराला माघारही घ्यावी लागली जाऊ शकते. त्यामुळे २५ जानेवारीला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीकडे लक्ष्य लागून राहिले आहे.

  पिंपरीत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली..!
  महाविकास विकास आघाडीकडून या पोटनिवडणुकीत कोण उमेदवार देणार याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे. यातच लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात यापुर्वी निवडणुक लढविणारे अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे, राष्ट्रवादीमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे व नवनाथ जगताप हे ही पोटनिवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत.