अबब! मागील अकरा महिन्यात साईचरणी जमले ‘एवढे रेकॉर्डब्रेक’ दान

श्री साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिले. गेल्या 11 महिन्यांत साईचरणी तब्बल 398 कोटी रुपयांचे दान अर्पण करण्यात आले. तर गेल्या अकरा महिन्यांत तब्बल दीड कोटीपेक्षा जास्त भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. देश-विदेशातूल भाविकांनी साईंच्या चरणी दर्शनासाठी आले.

    शिर्डी : देशात 22 मार्च 2020 साली कोरोनामुळं (Corona) टाळेबंदी लागली आणि संपूर्ण देश कुलुपबंद झाला. दरम्यान, यावेळी सर्व यंत्रणा, संस्था, आस्थपना, शाळा, कॉलेज, मंदिर आदी बंद करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी या महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मात्र कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर मागील वर्षापासून पुन्हा एकदा अनलॉक करण्यात आले. तेव्हापासून सर्व काही खुले झाले आहे. यावेळी देशातील प्रसिद्ध मंदिरं देखील खुली करण्यात आले होती. तेव्हापासून प्रसिद्ध शिर्डीतील (Shirdi) साईचरणी (Sai Baba) मोठं दान भविकांनी अर्पण केलं आहे.

    श्री साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिले. गेल्या 11 महिन्यांत साईचरणी तब्बल 398 कोटी रुपयांचे दान अर्पण करण्यात आले. तर गेल्या अकरा महिन्यांत तब्बल दीड कोटीपेक्षा जास्त भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. देश-विदेशातूल भाविकांनी साईंच्या चरणी दर्शनासाठी आले, तेव्हा मोठ्या प्रमाणात दान केल्याचे समोर आले आहे. मागील अकरा महिन्यात रेकॉर्डब्रेक असे दान साईचरणी प्राप्त झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.