मागील अडीच वर्षात मविआने अनेक मोठे निर्णय घेतले, या बंडामागे कोण आहे हे आता कळले – शरद पवार

राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. वर्षावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेनेची बैठक घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी सुद्धा पत्रकार परिषद (Ajit pawar press conference) घेतली आहे. तसेच आता काँग्रेसकडून (Congress) सुद्धा यावर प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) सुद्धा पत्रकार परिषद घेतली आहे.

    मुंबई : शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर आता राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. वर्षावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेनेची बैठक घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी सुद्धा पत्रकार परिषद (Ajit pawar press conference) घेतली आहे. तसेच आता काँग्रेसकडून (Congress) सुद्धा यावर प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) सुद्धा पत्रकार परिषद घेतली आहे.

    दरम्यान, आसाममध्ये भाजपचं (BJP) सरकार आहे. या बंडामागे कोण आहे हे कळतं. एकनाथ शिंदे हे इथे आल्यावर शिवसेनेत असल्याचं सांगतील, अडीच वर्ष हिंदुत्व आठवलं नाही का? असा सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित केला आहे.बंडखोर आमदारांना राज्यपाल किंवा विधानसभेत तरी यावं लागेल असं सुद्धा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. पुढे बोलताना पवार म्हणाले की, निधीच्या आरोपात काही तथ्य नाही, या आमदारांना मतदारसंघातही तोंड द्यावं लागेल, इथं आल्यावर सेनेच्या बंडखोर आमदारांना भाजप मार्गदर्शन अशी शक्यता वाटत नाही. देशात अनेक राष्ट्रीय पक्ष आहेत. तसेच आमदार परत येतील याची आम्हाला खात्री आहे. मागील अडीच वर्षात मविआने अनेक मोठे निर्णय घेतल्याचे सुद्धा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.