राज्यात मे महिन्यात विविध विभागात २१ हजार ५५६ बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाली, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना (Due to corona unemployed people) कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत (Skills, Employment, Entrepreneurship and Innovation) राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये मे २०२२  मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला.

    मुंबई : राज्यातील बेरोजगारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील महिन्यात म्हणजे मे 2022 मध्ये विविध विभागात (Verious Depertment) 21 हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना (21,000 unemployed) रोजगार (Job) मिळाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना (Due to corona unemployed people) कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत (Skills, Employment, Entrepreneurship and Innovation) राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये मे २०२२  मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री राजेश टोपे (Minister Rajesh Tope) यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

    दरम्यान, विविध उपक्रमांमधून राज्यात जानेवारी ते मे २०२२ अखेर ६८ हजार ४४३ उमेदवार नोकरीस लागले आहेत. मागील वर्षी राज्यात 2 लाख 19 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी 2020 मध्ये 1 लाख 99 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

    नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

    विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९५ हजार ४५० इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.