भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली 3 कोटींची खंडणी, कोथरुड पोलिसांकडून दोघांना अटक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुण्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने दोघांनी खंडणी मागितली या संबंधी संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर “कॉल मी” नावाचे एक ॲप डाऊनलोड करून त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲप द्वारे समोरच्या व्यक्तीला असे भासवले गेले की हा खरंच मोहोळ यांचाच नंबर आहे. तसेच आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाचा देखील नंबरचा गैरवापर केला.

या दोघांनी या ॲपचा वापर करत पुण्यातील व्याव्यासिकला फोन करून भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला पैसे लागणार आहेत. यासाठी ३ कोटी रुपये द्या असे सांगून खंडणी मागितली. हा सगळा प्रकार खोटा असल्याचे लक्षात येताच त्या व्यावसायिकाने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ मोबाईल क्रमांकावरून शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.