हिवाळ्यातच उजनीचे पाणी पेटले! सोडलेले पाणी बंद करण्यासाठी युवा सेनेचे बोंबाबोंब आंदोलन

चालू वर्षी उजनी धरण लाभ क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात पावसाने दगा दिल्यामुळे केवळ ६०.६६ टक्के भरलेल्या धरणात ५ नोव्हेंबर रोजी सोडलेले कालव्याद्वारे आवर्तन (पाणी) चालू असून जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी व पालकमंत्री यांच्यावर पाणी सोडल्यकचा आरोप करीत आवर्तन बंद करण्यासाठी सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने उजनी धरणाच्या कालव्यावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

  टेंभुर्णी : चालू वर्षी उजनी धरण लाभ क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात पावसाने दगा दिल्यामुळे केवळ ६०.६६ टक्के भरलेल्या धरणात ५ नोव्हेंबर रोजी सोडलेले कालव्याद्वारे आवर्तन (पाणी) चालू असून जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी व पालकमंत्री यांच्यावर पाणी सोडल्यकचा आरोप करीत आवर्तन बंद करण्यासाठी सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने उजनी धरणाच्या कालव्यावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यामुळे ऐन हिवाळ्यातच उजनीच्या पाण्यावरून वातावरण तापले. अगोदरच कमी असलेला पाणीसाठा पुन्हा एकदा वायफळ चाललेल्या पाण्याच्या आवर्तनामुळे खलावत चालली पाणी पातळी संक्राती नंतर मृत साठ्यात जाणार असून यानंतर उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार असून जानेवारीनंतर पुढचे किमान आठ महिने तरी शेतीसाठीचे आवर्तन सोडवणार नसल्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

  सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण चालू हंगामात ६०.६६ टीएमसी इतकेच भरले होते.तर  गेल्या दोन महिन्यातच २२.२७ टिएमसी पाण्याचा वापर झाला आहे. ९६. १५ टिएमसी पाणीसाठा झाला होता. पैकी ७३.८८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे..सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने काही भागात दडी मारल्याने किमान चालू पिके सुरक्षित रहावीत यासाठी उजनी धरणातून उजनी कालवा, दहिगाव, सिना-माढा उपसा सिंचन योजना, भीमा-सिना जोड कालवा यातून आवर्तन सोडण्यात येत होते. सलग दोन महिने आवर्तन सोडल्यामुळे उजनी पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याचा आरोप युवासेनेचा वतीने जिल्ह्यातील पालकमंत्री व लोक प्रतिनिधी यांच्यावर केला गेला आहे.

  सल्लागार समितीचा बैठकीत ठरल्याप्रमाणे पाणी दिल्याची पाटबंधारे विभागाची माहिती
  कुठलेही चुकीचे आवर्तन दिले गेले नसून कालवा सल्लागार समितीचा बैठकीत ठरल्याप्रमाणे हे पाणी दिले असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली. सध्या उजनी धरणात १९.०९ टक्के पाणी पातळी असून एकूण  ७३. ८८ टिएमसी पाणीसाठा तर १०.२३ टिएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कालव्याचे आवर्तन २५ डिसेंबर रोजी बंद करण्यात येणार असून सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून जानेवारी पहिल्या आठवड्यात भीमा नदीतून आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे धीरज साळे यांनी सांंगितले. उजनी धरणातील गेल्या दोन महिन्यात २२.२७ टिएमसी पैकी कार्तिक वारी नदीसह एकूण १७. २१ टिएमसी पाणी सोडले आहे.

  एकूण दिलेले आवर्तन टिएमसीमध्ये

  दहिगाव सिंचन योजना – ०.७६
  सिना-माढा उपसा सिंचन – १.९३
  भिमा-सिना जोड कालवा – ३.४२
  उजनी मुख्य कालवा – ९.६३
  नदीव्दारे    – १.४७ टिएमसी
  एकूण – १७.२१ टिएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

  जलसमाधी घेण्याचा युवा सेनेचा इशारा

  उजनी धरणातील सध्याचे आवर्तन बंद करून मार्च एप्रिल महिन्यात देण्यात यावे यासाठी उजनी धरणावर युवासेनेचा वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. दोन दिवसात हे पाणी बंद केले नाही तर उजनी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, सचिन बागल, युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख,जीवनराजे राऊत यांनी दिला आहे. उजनी धरण हे मृत साठ्यातील सर्वात मोठे धरण असल्याने पुढचे सहा महिने पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करून पाणी टिकवावे लागणार आहे.