जिल्हा परिषदेत मोकाट फिरणाऱ्यावर करडी नजर ; प्रवेशद्वारावरच होणार अभ्यागतांची नोंदणी

जिल्हा परिषद मुख्यालय आवर परिसरात मोकाट फिरणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. मुख्यालय आवारात प्रवेश करते समयी अभ्यागंताची नाव नोंदणी करण्यात येणार आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषद मुख्यालय आवर परिसरात मोकाट फिरणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. मुख्यालय आवारात प्रवेश करते समयी अभ्यागंताची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पे अँड पार्क अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

    याबाबत सीईओ दिलीप स्वामी यांनी दिलेल्या माहीती नुसार मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषद आवारात अभ्यागतांची गर्दी वाढत असून त्यातील अनेक लोक हे प्रत्यक्ष जिल्हा परिषदेतील कामासाठी आलेले नसतात असे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषदेच्या अवतीभोवती जिल्हाधिकारी कार्यालय, उत्तर, दक्षिण पंचायत समिती, तहसील कार्यालय, शासकीय व इतर बँका आदी कार्यालये आहेत. त्याठिकाणी कामकाजासाठी आलेले लोक जिल्हा परिषद आवारात आपली वाहने लावून जातात. त्यामुळे जिल्हा परिषद आवारात वाहनांची प्रचंड गर्दी होते. जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहने लावण्यासाठी यामुळे अडचण येत आहेत. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद आवारातून कर्मचाऱ्यांची वाहने चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

    जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठीचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद आजी – माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कामकाजासाठी येणारे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी यांच्याव्यतिरिक्त सर्वांना येथून पुढे पे ॲन्ड पार्क ही योजना अंमलात आणली जाणार आहे.यामुळे जिल्हा परिषदेत जिल्हा कार्यक्षेत्रातील कामाशिवाय येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील आळा बसणार आहे.

    येत्या 25 नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे नागरिकांनी आपली निवेदने, तक्रारी आदी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून इ तक्रार प्रणालीवर आपल्या तक्रारी दाखल कराव्यात. त्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांना उत्तर दिले जाईल.
    अशी माहिती यावेळी सीईओ स्वामी यांनी दिली.