उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला पोलीस ठाण्यात गोळीबार

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे.

    कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या एका सहकार्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास सुरू केला आहे.

    अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. या जमिनीच्या वाद प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावेळी आमदार गायकवाड यांनी गोळीबार केला. यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.