in wadvali village near kalyan seeing a long snake in the house snake friend caught the cobra saved lives nrvb

ब्लॅक कोब्रा प्रजीतीचे नाग साधरणपणे मध्य प्रदेश, राजस्थान ह्या भागात जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे कल्याण मध्ये ब्लॅक कोब्रा आढळल्याने प्राणी मित्रांनी थोडे नवल व्यक्त केले.

    कल्याण : वडवली गाव (Wadavali Village) परिसरात राहणार्‍या दुर्गेश झा (Durgesh Jha) ह्यांच्या घरात भला मोठा नाग (Cobra Snake) शिरल्याने घरातील लोकांची भितीने धादंल उडाली समयसूचकता दाखवित स्थानिक नागरिकांनी वाॅर फाऊंडेशनच्या (War Foundation) मदत क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली त्यावेळी सर्पमित्र रोमेश यादव (Sarpamitra Romesh Yadav) व प्रतीक पाटील (Pratik Patil) ह्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली व घरात शिरकाव केलेल्या ब्लॅक क्रोबा प्रजातीच्या लांबलचक मोठ्या नागास पकडून जीवदान दिल्याचे पाहता उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. सुटकेचा निश्वास टाकला.

    ब्लॅक कोब्रा प्रजीतीचे नाग साधरणपणे मध्य प्रदेश, राजस्थान ह्या भागात जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे कल्याण मध्ये ब्लॅक कोब्रा आढळल्याने प्राणी मित्रांनी थोडे नवल व्यक्त केले. वाँर फाऊंडेशन चे सदस्य सर्पमित्र रोमेश यादव यांने पकडलेल्या नागाबाबत धक्कादायक संभाव्य माहिती दिली की, नागपंचमी व महाशिवरात्र हे महाराष्ट्रातील मोठे सन आहेत व त्यात नागाचे खूप महत्व असते.

    ह्याच गोष्टीचा फायदा घेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व ईतर भागातून गारुडी नागाच्या विष ग्रंथी काढून किंवा तोंड शिवून अवैधरीत्या हे नाग घेऊन महाराष्ट्रात येतात व ठीक ठिकाणी खेळ दाखवून व धार्मिक गोष्टींचा आढावा घेऊन पैसे कमवतात हे नाग जास्त दिवस जगत नाही त्यामुळे परत जाताना गारुडी नाग येथेच सोडून जातात हा नाग असाच गारूड्याने सोडलेला असावा अशी प्राथमिक माहिती दिली.

    सर्पमित्र रोमेश यांनी जीवदान दिलेल्या नागास वाँर फाऊडेशनचे योगेश कांबळे, पार्थ पाठारे, मंदार सावंत, रेहान मोतीवाला, अनुराग लोंडे यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या ताब्यात दिले .