हिजाब-बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला; वाशिममधील प्रकार उघड

मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात नीटचा पेपर घेण्यात आला होता. मात्र, या विद्यार्थ्यांसह इरम मोहम्मद जाकीर आणि अरिबा समन गझनफर हुसैन यांच्यासोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी- सदस्यांशी गैरवर्तन केले. ते म्हणाले की बुरखा काढा नाही; तर कात्रीने कापावे लागेल. एवढेच नव्हे तर भर रस्त्यात हिजाब आणि बुरखा काढायला लावला गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

    वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय (Matoshri Shantabai Gote College) केंद्रावर रविवारी नीट (NEET)चा पेपर घेण्यात आला. यावेळी, मुस्लीम विद्यार्थिनींनी (Muslim Students) चेहरा आणि हॉल तिकिट दाखविल्यानंतरही हिजाब-बुरखा (Hijab-Veil) काढण्यास सांगण्यात आल्याचा आरोप त्यांच्यासह पालकांनी केला आहे. याप्रकरणी वाशिम (Washim) पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

    मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात नीटचा पेपर घेण्यात आला होता. मात्र, या विद्यार्थ्यांसह इरम मोहम्मद जाकीर आणि अरिबा समन गझनफर हुसैन यांच्यासोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी- सदस्यांशी गैरवर्तन केले. ते म्हणाले की बुरखा काढा नाही; तर कात्रीने कापावे लागेल. एवढेच नव्हे तर भर रस्त्यात हिजाब आणि बुरखा काढायला लावला गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

    पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, आधी परीक्षा कक्षात येण्यास मज्जाव (Prohibition) करण्यात आला, नंतर हिजाब आणि बुरखा काढून टाका, असे सांगून बाहेर पाठवण्यात आले. वादावादी झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर बुरखा आणि हिजाब काढण्यात आला. परीक्षा कक्षातही (Exam Center) उपस्थित शिक्षकाचे वर्तन योग्य नसल्याचेही पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी ठाणेदार रफीक शेख हे करत आहे.