बीटस्तरीय स्पर्धेत ‘इनामवाडी’ शाळेचे घवघवीत यश

यशवंतराव कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

  जुन्नर :  यशवंतराव कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत अमरापूर बीटच्या क्रीडास्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव या ठिकाणी पार पडल्या.  या स्पर्धेमध्ये इनामवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले .

  – लहान गट
  मुलांच्या लांब उडीत सागर मोधे याने प्रथम क्रमांक क्रमांक पटकावला. ५०मीटर धावणे स्पर्धेत  सागर  मोघे याने द्वितीय क्रमांक, खोखोत मुलींच्या संघाने प्रथम, मुलांच्या संघाने द्वितीय, लेझीममध्ये मुलींच्या संघाने प्रथम,  मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.

  – मोठा गट :
  उंच उडीत मुलांमध्ये  आर्यन मोधे याने प्रथम, थाळीफेकमध्ये मुलींमधून निसर्गा  भालेकर हिने प्रथम, तर
  १०० मीटर धावणे स्पर्धेत मुलींमध्ये  सुहाना मोधे हिने प्रथम, लांब उडीत मुलींमधून शामल  काळे हिने द्वितीय क्रमांक मिळविला.

  – सांघिक खेळ – मोठा गट
  खो-खोत मुलांच्या संघाने तसेच लोकनृत्यमध्ये शाळेने   प्रथम क्रमांक मिळविला.  या सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन आगर केंद्राचे केंद्रप्रमुख निवृती बांगर, मुख्याध्यापिका  अरूणा जुन्नरकर,  शांताराम मोधे,  सुमन उतळे, निवृत्ती दिवटे, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल साबळे  यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कुसुरचे सरपंच दत्तात्रय ताजणे, उपसरपंच संदिप दुराफे, रेश्मा केदार, पालक व ग्रामस्थ यांनी सर्व विजयी स्पर्धकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.